पुणे : पुण्यामध्ये आज काँग्रेसभवन Pune Congress Bhavan मध्येच विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा उपश्याक्ष यांना वीट आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी काँग्रेसचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, भूषण रानभरे , युवराज नायडू, आणि राज जाधव या चौघा जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे शहर विद्यार्थी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान आज मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर आल्याचं चित्र भर काँग्रेस भवन मध्येच पाहायला मिळालं. यावेळी काँग्रेसचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, भूषण रानभरे, युवराज नायडू आणि राज जाधव यांनी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल पिसाळ यांना विटा आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.