मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या आजच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राजकारणाची अनेक समीकरणे बदलणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत युती तुटल्याचं स्पष्ट केले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील सर्व प्रमुख घटक पक्ष आणि लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच आता महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकरांनी धक्का दिला आहे. आज त्यांनी युतीतून आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचं स्पष्ट केले आहे.
https://www.facebook.com/share/v/fsswQRoRqjeyX9th/?mibextid=w8EBqM
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडीला तीन दिवसांचा अल्टीमेटम दिलाय. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीच भिजत घोंगड आहे. त्यांच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे आम्ही येत्या सहवीस मार्च रोजी आमची भूमिका जाहीर करू असं त्यांनी म्हटल आहे. त्याचबरोबर कोल्हापूरचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केल आहे.