पुणे : पुण्यातील अपघातानंतर Porsche car accident case वातावरण अद्याप देखील ढवळले गेलेलेच आहे. या प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे. याप्रकरणी मुलाला, मुलाच्या बापाला, बापाच्या बापाला ही अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही. असे थेट स्पष्टीकरण पालकमंत्री अजित पवार Guardian Minister Ajit Pawar यांनी दिले आहे.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर देखील थेट आरोप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया Social activist Anjali Damania यांनी तर अजित पवारांच्या नार्कोचाचणीची थेट मागणी केली होती. तर पवारांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार Police Commissioner Amitesh Kumar यांना फोन करून दबाव आणला. असा देखील आरोप त्यांच्यावर झाला होता. आज माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी स्पष्टच सांगून टाकले आहे.
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की,” पुणे अपघात प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पुण्याचा पालकमंत्री म्हणून मी, आम्ही चौकशीचे आदेश दिले. चौकशी जसजशी पुढे सरकत गेली याप्रकरणात अनेकांचा सहभाग दिसून आला. सुरुवातीच्या काळात अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. हा जामीन न्यायालयाने दिला होता, त्यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणात लक्ष घातले तेव्हा अल्पवयीन मुलाविरोधात आणखी कलमं लावण्यात आली. चौकशीत दोन पोलीस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचे समोर आले. त्यांच्यावरही कारवाई झाली. या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरही दोषी आढळले, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुलाच्या नावाने कोणाच्या रक्ताचे नमुने पुढे करण्यात आले होते, याची चौकशी सुरु आहे. मी सीपींना वर्षभर काही ना काही कारणासाठी फोन करत असतो. पुण्यातील अपघातानंतर मी त्यांना फोन करुन दोषींवर योग्य ती कारवाई करा, असे सांगितले. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हे सांगणं माझं काम आहे. ” असे स्पष्टीकरण आज पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.