सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मधून जोरदार प्रचार सुरू आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक स्वतः देखील आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आणि भेटीगाठी घेत आहेत. आज सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेतली. ही भेट चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.
आज सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कवलापूर विमानतळावर पोहोचले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी उपस्थित होते. विमानतळावरच या दोघांची भेट झाली यावेळी देवेंद्र फडणवीस यांना जवळ बोलावून संभाजी भिडे यांच्या कानात काहीतरी बोलले. नेमकं भिडे गुरुजी काय बोलले हा आजचा राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय ठरला आहे.
Pankaja Munde : ” मी उमेदवार म्हणून पसंत आहे का ? बदलून घ्यायचा का ? ” नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे ? वाचा सविस्तर
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जवळ बोलावून त्यांच्या कानात ते काहीतरी बोलले. नेमकं ते काय म्हणाले हे समजू शकलेलं नाही. परंतु या दोघांचा हा फोटो आजचा चर्चेचा विषय ठरला आहे.









