चंद्रपूर : वीस दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी आंदोलन आज अखेर मागे घेण्यात आले आहे. राज्य सरकार आणि ओबीसी नेत्यांमध्ये काल झालेल्या बैठकीत सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे अन्नत्याग उपोषण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले आहे.
राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर ओबीसी अन्नत्याग उपोषण आज मागे घेण्यात आले आहे. मराठांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट करू नये या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. दरम्यान रवींद्र टोंगे हा कार्यकर्ता अन्नत्याग आंदोलनास बसला होता. 11 सप्टेंबर रोजी सुरू झालेले हे आंदोलन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून लिंबू पाणी पिऊन सोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा बंद असे आवाहन देखील मागे घेण्यात आले आहे.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, कीर्ती भांगडीया हेही उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना फडणवीस यांनी ओबीसींवर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली.