नवी दिल्ली : बिहारमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर वेदांत रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितनुसार, शनिवारी सकाळी त्यांना हातामध्ये दुखत असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात तपासणी करून घेण्यासाठी गेले असता सध्या त्यांच्यावर रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागामध्ये तपासणी आणि उपचार सुरू आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निवडणुकीमुळे सभा दौरे यांमध्ये कार्यक्रम व्यस्त होते. सातत्याने कामकाज झाल्याने त्यांना विश्रांती मिळू शकली नाही आणि त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे सध्या तपासणी सुरू आहेत.