अहमदनगर : नीलेश लंके Nilesh Lanke यांनी आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात Ahmednagar Lok Sabha Constituency निवडणुक लढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज अगदी साधेपणाने दाखल केला. मतदारसंघातील आजी माजी आमदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व काही प्रमाणात कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सन 2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीतही लंके यांनी शक्तीप्रदर्शन न करता अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्यांच्या हस्ते आपला अर्ज दाखल केला होता. तशाच पध्दतीने याही 2024 च्या लोकसभा निवडणूकीत लंके यांनी कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता आपला अर्ज दाखल केलाय. यावेळी निलेश लंके यांची मुलगी अक्षदा लंके व बहीण वंदना या देखील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होत्या.
Lok Sabha Elections 2024 : ” पार्थने चिंता करू नये, त्याच्या पराभवाचा बदला आम्ही घेऊ ! ” आमदार रोहित पवारांचा पार्थ पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन थेट अजित पवारांवर निशाणा
https://mahatalks.com/politics/parth-should-not-worry-we-will-avenge-his-defeat
काल महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या शक्तिप्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. मोठे शक्तिप्रदर्शन यावेळी करण्यात आले. परंतु आज कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.