नाशिक : नाशिक Nashik मधून महायुतीचा उमेदवार कोण ? याबाबत अजूनही वाद सुरूच आहे. दरम्यान छगन भुजबळ Chhagan Bhujbal हे कमळ चिन्हावर निवडणूक लढणार अशा चर्चा नाशिकमध्ये सुरू होत्या. यावर आता स्वतः छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितले की, ” कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा निरर्थक आहे. या चर्चेला कोणताही आधार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नाशिकची जागा मागितली होती. तसेच प्रफुल्ल पटेल यांनी महायुतीच्या बैठकीत छगन भुजबळांनाच नाशिक मधून उभे करा असे सांगितले होते. ” असं गुरुवारच्या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ म्हणाले आहेत.
Kolhapur : संजय मंडलिक यांनी माफी मागण्यास दिला थेट नकार; कोल्हापूरचे खरे वारसदार कोण? मंडलिकांच्या विधानाने राज्यातून संताप व्यक्त
नाशिक मधून अद्याप उमेदवारीचा पेच सुटला नाहीये. दरम्यान राज ठाकरे हे देखील सातत्याने छगन भुजबळ यांच्यावर टीका करत होते. परंतु आता राज ठाकरे यांनी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे छगन भुजबळ यांनी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले की, ” राज यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने महायुतीची ताकद निश्चितपणे वाढणार आहे. राज ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत त्यांचा जनमानसावर प्रभाव आहे. ” असं भुजबळ यावेळी म्हणाले आहेत.