मुंबई : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी चौथ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती प्रचंड प्रमाणात खालवली असून त्यांच्या नाकातून देखील आज रक्तस्राव झाला आहे. दरम्यान नारायण राणे Narayan Rane यांनी आज ट्विट Tweet करून मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशी घणाघाती टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सातत्याने ढासाळत असून जोपर्यंत सगळे सोयरे याबाबत अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही अशीच भूमिका त्यांनी घेतली आहे पाणीदेखील पिण्यास आणि उपचार घेण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होतं तसेच महाराष्ट्र बंदची हाक दिली असून महाराष्ट्रातील सोलापूर नाशिक बीड जालना या जिल्ह्यांमध्ये बंदला प्रतिसाद देखील मिळताना दिसून येतोय.
त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही
दरम्यान आता नारायण राणे यांनी एक जहरी टीका करणारी पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिला आहे की, मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत