नागपूर : आजची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. काँग्रेसचे आमदार सुनील केदार Congress MLA Sunil Kedar यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालया Nagpur District Sessions Court ने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली असून दहा लाखांचा दंड देखील केला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री राहिलेले सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालय तब्बल 31 वर्षानंतर शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सुनील केदार यांना आता पाच वर्ष शिक्षा त्याचबरोबर दहा लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असून दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन एक वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा फार मोठा धक्का मानला जातो आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
हे प्रकरण आहे 1999 साली घडलेले. यावेळी नागपूर जिल्हा बँकेचे सुनील केदार हे अध्यक्ष पद भूषवत होते. यावेळी बँकेतील रक्कम एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने कलकत्त्यातील कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवण्यात आली. तथापि सहकार विभागाच्या कायद्यानुसार बँकेची परवानगी न घेता बँकेची रक्कम इतर ठिकाणी गुंतवता येत नाही. त्यानंतर 2022 मध्ये दीडशे कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. ज्या कंपन्यांमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यात आली होती त्या कंपन्या पुढे दिवाळीखोरीत निघाल्या. त्यामुळे बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडाले होते. यानंतर आज केदार आणि इतर सह आरोपींना देखील पाच वर्षाची शिक्षा आज ठोठावण्यात आली आहे.