मुंबई : मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर माथाडी कामगार नेते महेश जाधव Mahesh Jadhav यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यासह मनसे पक्ष आणि राज ठाकरे यांबाबत देखील अपशब्द बोलले गेले आहेत. दरम्यान अमित ठाकरे Amit Thackrey यांनी आपल्याला बोलावून मारहाण केली असल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला. त्यासह फेसबुकवर एक लाईव्ह व्हिडिओ प्रसारित देखील केला आहे.
दरम्यान यावर आता मनसेने कठोर कारवाई करून राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे असे पत्रक जारी केले आहे.

या पत्रकामध्ये लिहिले आहे की, ” सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळविण्यात येत आहे की, सन्माननीय राज साहेबांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. मराठी कामगार सेना या संघटनेचा त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी अथवा पक्षाच्या अंगीकृत संघटना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची कोणताही संबंध नसेल त्यामुळे मराठी कामगार सेनेच्या कोणत्याही भूमिकांशी मराठी कामगार सेनेच्या पदाधिकारी सदस्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचा पक्षाच्या इतर अनेकृत संघटनांचा कोणताही संबंध नसेल याची सर्व महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी असे या पत्रकात म्हटले आहे.
काय म्हणाले मनसे नेते संदीप देशपांडे
दरम्यान या प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “अमित ठाकरे यांच्याकडे महेश जाधव यांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी महेश जाधव यांना जाब विचारण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी महेश जाधव यांना उलट सुलट उत्तर दिली. त्यांनी ज्या शब्दात अमित ठाकरे यांच्याशी वाद घातला त्यावरून मनसे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी महेश जाधव यांना प्रसाद दिला असं देशपांडे यांनी म्हटल आहे.”
