जालना : जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक MARATHA RESERVATION मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू आहे. दहा फेब्रुवारीपासून हे आमरण उपोषण सुरू झाले आहे. काल अचानक त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणावर खालावली होती. नाकातून रक्तस्त्राव झाला त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली होती.
दरम्यान आज काही प्रमाणात त्यांची प्रकृती ठीक आहे. काल सलाईन लावल्यानंतर त्यांना काही प्रमाणात बरं वाटलं. परंतु त्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला. मेलो तर मुंबईत सरकारच्या दारात नेऊन टाका असा राग त्यांनी व्यक्त केला. तर जोपर्यंत सगे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. तसेच सरकारन जर लवकर निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा मुंबईत धडक मारणार तशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
https://www.facebook.com/share/v/Fgaj9NPMyAFcVBqA/?mibextid=w8EBqM
सगे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी 10 फेब्रुवारी पासून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा हे आमरण उपोषण सुरू केला आहे. दरम्यान आज त्यांची प्रकृती अस्वस्थच आहे. काल सलाईनद्वारे पोटात काही औषध गेली असली तरी आज त्यांना पोटदुखीने मोठा त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान आता राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणाकडे कशा पद्धतीने पाहते आणि काय तोडगा काढते हे येणारा काळच ठरवेल.