जालना : Maratha Reservation मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचा बडगा उगारला आहे. राज्य सरकारने येत्या 15 दिवसात सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा १० फेब्रुवारीला पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटले आहे. यासंदर्भात 9 तारखेपर्यंतची डेडलाईन दिली आहे.
जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येत्या 9 तारखेला सरकारला दिलेल्या मुदतीचे 15 दिवस पूर्ण होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
https://www.facebook.com/share/v/pyobjRSjZbW8NgVB/?mibextid=jmPrMh
जरांगे पाटलांच्या नव्या मागण्या नेमक्या कोणत्या :
▪️येत्या 9 तारखेपर्यंत कायद्याची अंमलबजावणी करा.
▪️अंतरवलीतील मराठा आरक्षण संदर्भातील गुन्हे मागे घ्यावेत
▪️सगेसोयऱ्याच्या कायद्याची प्रक्रिया सुरु करा.
▪️1884चं हैदराबादचं गॅझेट स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा द्या.