गेवराई : मराठा आरक्षणावरून Maratha Reservation मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये काटे की टक्कर सुरूच आहे. सातत्याने एकमेकांवर शाब्दिक प्रहार दोघांचाही सुरू असतानाच जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
जरांगे पाटील सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान बीड मधील गेवराई तालुक्याच्या गंगावाडी गावामध्ये मनोज जरांगे पाटील सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, ” मराठा समाजाला यापूर्वी देखील आरक्षण मिळालं. मात्र छगन भुजबळ यांनी पडद्यामागून पैसे देऊन आरक्षणाला विरोध करण्यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल करायला लावल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ज्या ज्या समित्यांनी आतापर्यंत काम केलं. त्या समित्यांचा अहवाल खोटा ठरवण्यासाठी छगन भुजबळ यांनी सातत्याने प्रयत्न केला. असा थेट आरोप करत येवल्याचं येडपट अशी बोचरी टीका देखील मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरु; सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी – जरांगे पाटील