मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि मुंबईला भरवणार आंदोलन छेडलं. मराठा आंदोलक आज मुंबईमध्ये पाटील यांच्या सोबतीने मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत. अखेर राज्य सरकारला जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात लागल्या आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागलं. परंतु ही जनतेची दिशाभूल आहे. असं थेट वक्तव्य घटना तज्ञ उल्हास बापट यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले घटनातज्ञ उल्हास बापट
मराठा आरक्षण हे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार समोरचा सर्वात कळीचा मुद्दा होता दरम्यान आज या लढ्याला यश आलं असलं तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. असं मत घटना तज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोललेला प्रत्येक शब्द लिहून ठेवला आहे. ओबीसींना धक्का न लावता 50 टक्क्यांवर, कायद्यात बसणारं, कोर्टात टिकणारं आरक्षण देऊ म्हणाले, ही जनतेची दिशाभूल आहे. अशा पद्धतीने सांगू नये, ही लढाई सुप्रीम कोर्टात जाणार असून त्याठिकाणी भवितव्य निश्चित होईल, असे घटना तज्ञ उल्हास बाबत म्हणाले आहेत.
तसेच मराठा समाज 80 ते 90% मागास आहे हे खरं असलं तरी क्रिमिलियरची व्याख्या केलेली नाही. आरक्षण दोन प्रकारे देता येते एक कायदेमंडळ करते आणि दुरुस्ती करून वाढवते. ते 2030 मध्ये होईल कलम 15 आणि 16 मध्ये नोकऱ्या आणि शिक्षणासंदर्भात आहे. आरक्षण ही सुविधा तो मूलभूत अधिकार नाही. हे समजून घ्यावे लागेल सध्या 50 टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही. ते बदलायचं झाल्यास 11 न्यायमूर्तींचे घटनापीठ करून करावं लागेल. मात्र अशी परिस्थिती नाही. कोणताही समाज मागास ठरवून आरक्षण देताना ट्रिपल टेस्ट असून मागासवर्गीय आयोग डेटा आणि ते 50 टक्क्यांवर जाता कामा नये. असा कायदा सांगतो त्यामुळे दाखल्यातून दिलेलं आरक्षण हे बसत का ते बघावं लागेल. असं स्पष्ट मत घटना तज्ञ उल्हास बापट यांनी मांडलं आहे.