जालना : राज्य सरकारच्या State Government शिष्टमंडळाने काल गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी सगेसोयरे या एका शब्दावरून ही बैठक फिसकटली आहे. यानंतर ओबीसींच्या OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण Maratha Reservation देण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असं गिरीश महाजन यांनी काल स्पष्ट केले. तर आज पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी ” देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकणार नाही…! असे थेट वक्तव्य केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मनोज रंगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण आणि राज्यभरात सभा घेतल्या आहेत. 23 डिसेंबर पर्यंत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल अशा आश्वासनावरच त्यांनी त्यांचे दुसरे उपोषण थांबवले होते. दरम्यान महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सातत्याने झंझावाती सभा देखील सुरू आहेतच. आज परभणीमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की , “आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत कसा बसायचा हे त्यांनी बघायला हवं, त्यातल्या दोन शब्द मुख्यमंत्र्यांनी पटलावर घेतले नाही. तो कागदही त्यांच्याकडे आहे, आम्हाला टाईम बॉण्डबाबत नाही बोललं तर बरं होईल, शब्द त्यांच्याच मंत्रीमंडळानं दिला, तोच त्यांनी पाळावा, ज्यांची 1967 च्या आधीची नोंद मिळाली, त्याच्या सर्व नातेवाईकांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे.”
“सगे सोयरे या शब्दांमुळे सर्व काही अडकलं आहे. सरकारला 24 डिसेंबरचा वेळ आहे. त्यांनी सांगितलं, मी जरांगे पाटलांना बोलणार नाही, तर मी पण नाही बोलणार. मराठा समाज कधीही एवढा प्रमाणात एकत्र आला नव्हता, आता तो आलाय. हेच सरकारला खुपतंय. याआधी तुम्ही नोटिसा आदी देऊन प्रयत्न केला, मात्र तो आता होऊ देणार नाही. हे दोन पार्ट आहेत. हा मुद्दाच वेगळा आहे. आईच्या मुलालाच जर त्याचा लाभ मिळत नसेल तर किती मोठी शोकांतिका आहे. एका शब्दावर 4 तास चर्चा झाली. त्यांनी लिहिलेल्या 4 ही शब्दावर आक्षेप. 54 लाख नोंदी हा अधिकृत आकडा आहे. आम्हालाही सांगणारे आहेत, त्यांच्यातल्याच लोकांना वाटतं की, आंदोलन सुरू रहावं. 54 लाख नोंदी हा पुरावा. मी त्यांना सांगितलं होतं की, अधिवेशनाचा वेळ वाढवा मात्र तसं नाही केलं, अन् नोटिसा देण्याचं काम करत आहेत. एक प्रयोग केला त्यानं काय झालं? हे त्यानं पाहिलं. आता पुन्हा दुसरा प्रयत्न करू नये, देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही.” असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटले आहे.