Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात वादंग वाढतच चालला आहे. एकीकडे मनोज जरंगे पाटील यांनी आजच्या सभेमध्ये जहरी टीका राज्यसरकारवार केल्या आहेत. तसेच जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षण सरसकट ओबीसी मधून मिळावे यासाठी राज्यसरकारला दिलेला अल्टिमेटम संपला आहे. त्यामुळे आता उद्या पासून महाराष्ट्रात पोलीस प्रशासन कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये या दृष्टीने अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान मराठा आरक्षणा बाबत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. हि क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून माहिती दिले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय केले ट्विट
महायुती सरकारचा मोठा विजय !!
राज्यातील महायुती सरकारने भक्कमपणे सुप्रीम कोर्टात बाजू मांडल्यामुळे कायदेशीर मराठा आरक्षण मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाची असलेली क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थगित झालेलं मराठा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा मार्ग प्रशस्त झाला.
मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी कुठल्याही प्रवर्गाला धक्का न लावता मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी महायुती सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मजबुतीनं मांडेल आणि मराठा समाजाला न्याय देईल ही खात्री आहे.
जय जिजाऊ- जय शिवराय