हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवरायांना वंदन करुन आणि उपस्थितांना प्रमाण करुन मनोज जरांगेंनी भाषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की… राष्ट्रमाता जिजाऊ माता की… मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो… घोषणांनी संपूर्ण सभास्थळ दुमदुमून गेलं. जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी उपस्थित आहेत.
भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच जरांगे पाटील यांनी व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना खाली पाठवलं आणि सर्वांना सारखा न्याय असं ठणकावून सांगितलं. जरांगे पाटील म्हणाले की, व्यासपीठावरचे सगळे खाली जा, सगळ्यांना सारखा न्याय बाकीचे खाली बसलेत आणि तुम्ही इथं वर, मग मी जाईन हा तिथं, मी मराठ्यांत जात असतो मग खाली… असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी सर्वांना व्यासपीठावरुन खाली पाठवल.
मराठा समाज एक होत नाही, असं बोलणाऱ्यांच्या आज एकत्र जमून मराठ्यांनी मुस्काडात हाणली. कोण म्हणतो मराठा एक होत न्हाय… उपस्थितांनी एकत्र मनोज जरांगेंच्या सुरात सूर मिसळला. मनोज जरांगे पाटीलांनी मराठा आरक्षणाच्या मागण्या पुन्हा एकदा मराठा आंदोलकांसमोर सांगण्यास सुरुवात केली.
मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा. कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी . मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी. दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या. PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन, त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे. या प्रमुख मागण्या जरंगे पाटील यांनी केल्या आहेत.