बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil हे आज बीड दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजही जरांगे पाटील लढत आहेत दरम्यान त्यांच्या निशाण्यावर आजही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेतच आज उपस्थित त्यांना संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा गृहमंत्र्यांना दिवसला आहे
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात आज मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित अशी संवाद साधत असताना गृहमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, .” देवेंद्र फडवणीस चिल्लर चाळे करतात. मस्ती करणाऱ्याला आव जाव करत नसतात. मराठ्यांच्या नादी लागाल, तर तुमचं राजकारण संपून जाईल. आजपासून देवेंद्र फडवणीस यांना आहो जाहो बोलणं बंद! देवेंद्र फडणवीस यांनी पातळी सोडली आहे. तुझ्या एसटी रिकाम्या जातात… आम्ही काय करावं ? तू काय बधिर झालेला मंत्री आहे का…? तू मला जेलमध्ये टाक मराठे काय करतात बघ! ” अशी घणाघाती टीका जरांगे पाटलांनी केली आहे.
इतक्या खालच्या दर्जाचा गृहमंत्री मी आयुष्यात पहिल्यांदा बघितला…आहे तू मला सागर बंगल्यावर येऊ द्यायला पाहिजे होतं मग तुला कळले असते मी ऐकत नसेल तर माझ्या वर हल्ला करण्याचा डाव टाकला आहे असा घडाघाती आरोप मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वर केला आहे.