आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता राजकीय पक्षांकडून लोकसभा जागा लढवण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लोकसभा आणि विधानसभांसाठीची तयारी सुरू झाली आहे. शरद पवार गटाने लोकसभा जागांसाठीची तयारी सुरू केली आहे.
हे वाचलेत का ? मोठी बातमी : विजय वडेट्टीवारांना धमकीचा फोन; ‘त्या’ वक्तव्यामुळे वडेट्टीवारांवर नवीन संकट ? मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी
राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. अशातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीत 12 जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याशिवाय, खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी जो दावा केला होता तो शरद पवार गटाकडून खोडून काढण्यात आला आहे. अमोल कोल्हे यांनी आमच्या इथे सुद्धा प्रतिज्ञापत्र भरल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.