मुंबई : महाराष्ट्राने मागच्या दोन वर्षांमध्ये राजकारणात फार मोठे बदल पाहिले आहेत. हे बदल सामान्य माणसासाठी खरंतर पचवणं देखील कठीण होते. त्यातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एक खळबळ जनक दावा केला आहे. ते म्हणाले की, पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस बरोबर जाणार…
नेमकं काय म्हणाले शरद पवार
नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत मी खळबळ जनक वक्तव्य केल आहे. ते म्हणाले की, ” लोकसभा निवडणूक किंवा पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस बरोबर जाणार किंवा त्यातील काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करतील. ” शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आले आहे.
दरम्यान शरद पवार यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठ विधान केल. ते म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील असं थेट वक्तव्य केल्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये नवीन समीकरण तयार होणार का अशी चर्चा रंगली आहे.
नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” पराभव जवळ दिसू लागल्याने शरद पवारांनी असं वक्तव्य केल आहे. लोकसभेनंतर शरद पवारांची पार्टी आणि ठाकरेंची पार्टी, काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्यावेळेस काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन. या निवडणुकीनंतर त्यांची शिवसेना काँग्रेस बरोबर विलीन होणार.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.