माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय डेहराडूनला गेल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगडला गेले म्हणून त्यांच्यावर टीका करणारे उद्धव ठाकरे हे डेहराडूनला कसे जातात ? असा सवाल करतानाउपस्थित करत आदित्य ठाकरे यांना अटक होणार असा मोठा दावाही नितेश राणे यांनी केला आहे. राणे यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
हे वाचलेत का ? पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी; खासदार सुप्रिया सुळेंचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र
देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगडमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. फडणवीस पक्षासाठी गेले होते. कौटुंबिक सहलीसाठी नाही. तुम्ही फक्त कौटुंबीक सहलीसाठी गेला आहात, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी चढवला आहे.देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगडमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. फडणवीस पक्षासाठी गेले होते. कौटुंबिक सहलीसाठी नाही. तुम्ही फक्त कौटुंबीक सहलीसाठी गेला आहात, असा हल्ला नितेश राणे यांनी चढवला आहे.
https://x.com/NiteshNRane/status/1720281283354591350?s=20
आदित्य ठाकरे यांना का होऊ शकते अटक ?
दरम्यान, आदित्य ठाकरे यांना काही दिवसात अटक होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांचं नवा न घेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ही अटक होणार असल्याचं नितेश यांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून दसरा मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे देश सोडून जाणार आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.
हे वाचलेत का ? विक्षिप्त कपडे घालणं उर्फीला पडलं महागात; पोलिसांनी हाताला धरून बसवला पोलीस व्हॅनमध्ये, आणि मग पहा VIDEO
“मला आशा आहे की सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा खटला लवकरच सुरू होणार आहे. ही ट्रायल सुरू असताना अटक टाळण्यासाठी बेबी पेंग्विन देशातून गायब तर होणार नाही, असं सूचक ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना अटक होणार का? ते देश सोडून जातील का? अशी चर्चा रंगली आहे.” असे ट्विट त्यांनी केले आहे.