मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारी करत आहेत. कोणाला कुठे उमेदवारी द्यायची आणि कोणत्या पक्षाने कोणती जागा लढवायची याबाबत सध्या खलबती सुरू आहेत. लोकसभा जागा वाटपाबाबत आज महाविकास आघाडीची देखील महत्त्वाची बैठक पार पडली आहे. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी धैर्यवर्धन पुंडकर यांनी पत्राद्वारे महाविकास आघाडी कडून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी अशी मोठी मागणी केली आहे.
मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडी कडून जालन्यातून उमेदवारी यासह वंचित बहुजन आघाडीने आणखी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीने केल्या या चार प्रमुख मागण्या
- महाविकास आघाडीकडून मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी.
- डॉक्टर अभिजीत वैद्य यांना पुण्यातून महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात यावी.
- महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत 15 ओबीसी असावेत.
- महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत तीन अल्पसंख्यांक उमेदवार असावेत.
या चार प्रमुख मागणी वंचित बहुजन आघाडीने या महत्त्वाच्या बैठकीत मांडले आहेत. यासह महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकांना लेखी वचन द्यावं की पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि नंतर भाजपात सामील होणार नाही असा देखील प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने ठेवला आहे.