मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये सातत्याने बैठका आणि खलबती सुरू आहेत. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी देखील असणार आहे. त्या निमित्ताने आज बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडी ही इंडिया आघाडी सारखी होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
नेमकं काय घडलं
आज महा विकास आघाडीची जागा वाटपावरून बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. बैठक पार पडल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नाना पटोले आणि संजय राऊत हे देखील उपस्थित होते. यावेळी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या समोरच प्रकाश आंबेडकर यांनी थेट वक्तव्य करताना म्हटले आहे की, ” आता राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी उरली नाही. इंडिया आघाडीतून नितीश कुमार ,आप ,ममता बॅनर्जी यांनी वेगळी चूल मांडली आहे. समाजवादी पक्षांना 16 जागांवर उमेदवार जाहीर केले. मात्र समाजवादी सोबत राहील असा विश्वास आहे. या आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची काळजी घेणार असं थेट वक्तव्य यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
भीषण अपघात CCTV मध्ये कैद : पुण्यातील उरळी कांचनमध्ये भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी