महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातून जागा वाटपाचा पेच बराच सुटला आहे. दरम्यान आज 15 जागांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी अगदी एक दीड वर्षांपूर्वीच तयारी सुरू केली होती. आता लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. राजकारणामध्ये अनेक वादळ आली. मोठमोठे बदल झाले. इच्छुकांचे आणि अगदी विद्यमान खासदारांची तिकीट मिळण्यावरून वादविवाद झाले. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पंधरा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारांची नावे आज घोषित करण्यात येणार आहेत.
संभाव्य यादी नुसार,
नरेंद्र खेडेकर – बुलढाणा
संजय देशमुख – यवतमाळ वाशिम
नागेश पाटील – आष्टीकर हिंगोली
संजय जाधव – परभणी
चंद्रकांत खैरे – छत्रपती संभाजीनगर
ओम राजे निंबाळकर – धाराशिव
भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी
राजन विचारे – ठाणे
संजय दिना पाटील – मुंबई उत्तर पूर्व
अरविंद सावंत – मुंबई दक्षिण
अनिल देसाई – मुंबई दक्षिण मध्य
अमोल कीर्तीकर – मुंबई उत्तर पश्चिम
विनायक राऊत – रत्नागिरी सिंधुदुर्ग
अनंत गीते – रायगड
चंद्रहार पाटील – सांगली
संजय वाघेरे – मावळ
त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारास हातकणंगले मधून पाठिंबा देण्यात येणार आहे
या इच्छुकांची उमेदवारी निश्चित मानली जाते आहे. काही वेळात नावांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर या नावांवर शिक्कामोर्तब होईल. एकंदरीतच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा हा मोठा दाव महायुतीच्या उमेदवारांवर किती भारी पडतो हे निवडणुकीनंतरच समजेल.