महाराष्ट्र : यंदाची लोकसभा निवडणूक Lok Sabha Elections 2024 ही महाराष्ट्रातून पाच टप्प्यात होणार आहे. महायुती आणि आघाडीमधून अद्याप जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. परंतु पहिल्या टप्प्यातील लढत मात्र निश्चित झाली आहे.
पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीची लढत ही विदर्भातील नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात होणार आहे. या लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार निश्चित आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याचे अंदाज आता बांधले जात आहेत.
दरम्यान नागपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये नितीन गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसने विकास ठाकरे यांची उमेदवारी निश्चित केली असून आज विकास ठाकरे हे आपलं नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. या प्रक्रियेपूर्वी संविधान चौक ते कलेक्टर ऑफिस या परिसरातून शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे इतर महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Ahmednagar : आमदार निलेश लंके यांच्या उमेदवारीबाबत बाळासाहेब थोरात यांचे मोठे वक्तव्य, “…त्यामुळे निवडणूक देखणी होईल ! ” नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर
- पहिल्या टप्प्यामध्ये नागपूरातून नितीन गडकरी भाजप विरुद्ध विकास ठाकरे काँग्रेस अशी लढत होणार आहे.
- रामटेक मधून राजू पारवे शिवसेना एकनाथ शिंदे गट विरुद्ध रश्मी बर्वे काँग्रेस अशी लढत होणार आहे.
- गडचिरोलीतून अशोक नेते भाजप विरुद्ध डॉक्टर नामदेव किरसाण काँग्रेस अशी लढत होणार आहे.
- भंडा-यातून गोंदिया मेंढे भाजप विरुद्ध प्रशांत पडोळे काँग्रेस अशी लढत होणार आहे.
- चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर काँग्रेस अशी निवडणूक होणार आहे.