लोकसभा निवडणुकी 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Elections 2024 काँग्रेस Congress पक्षाने तयारी सुरु केली आहे. काँग्रेस अध्यक्षांनी आगामी सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी तात्काळ प्रभावाने जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये एकूण 16 काँग्रेस नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या जाहीरनामा समितीचे नेतृत्व पी चिदंबरम यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर टीएस सिंहदेव यांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले आहे. मात्र यामध्ये राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश नसल्याचे दिसले आहे. याबाबतची माहिती काँग्रेस सरचिटणीस यांनी ट्वीट करून दिली आहे.
या 16 काँग्रेस नेत्यांचा समावेश :
▪️प्रियंका गांधी
▪️सिद्धारमय्या
▪️शशी थरूर
▪️पी. चिदंबरम
▪️टी. एस सिंहदेव
▪️आनंद शर्मा
▪️जयराम रमेश
▪️गायखंगम
▪️गौरव गोगोई
▪️ प्रवीण चक्रवर्ती
▪️इमरान प्रतापगढी
▪️ के राजू
▪️ओमकार सिंह मरकाम,
▪️रंजीत रंजन
▪️ जिग्नेश मेवाणी
▪️ गुरदीप सप्पल