मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं पण आता महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात सत्यजित पाटील सरूडकर हे उमेदवार घोषित केले आहेत. नेमकं काय घडलं ? यावर भाष्य करण्यासाठी आज स्वतः राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
माध्यमांशी संवाद साधताना आज राजू शेट्टी यांनी थेट खुलासाच केला आहे. राजू शेट्टी म्हणाले की , “मी कुठल्याही पक्षात गेलो नाही. निवडणूक लढवण्यासाठी कुठल्यातरी एका पक्षात असावं म्हणून आम्ही स्वाभिमानी पक्षाची निर्मिती केली आहे. असं असताना मी मशाल चिन्ह हाती घेणं म्हणजे, महाविकास आघाडीत मशाल चिन्हं हे शिवसेना ठाकरे गटासाठी आरक्षित आहे. ते चिन्हं घ्यायचं तर त्यांचा एबी फॉर्म घ्यावा लागेल, एबी फॉर्म घ्यायचा असेल तर मला शिवसेनेत प्रवेश करावा लागेल. मग मीच स्थापन केलेला स्वाभिमानी पक्ष शिवसेनेत विलीन करायचा का?” जी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहे तिला वाऱ्यावर सोडायचं का? सर्व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं का? मी पक्षीय राजकारण करत बसलो तर मग शेतकऱ्यांचं काय? त्यामुळे मी माझ्या सहकाऱ्यांचा सल्लाही न घेता स्पष्टपणे सांगून टाकलं की, माझ्याकडून हे होणं शक्य नाही. मी मशाल चिन्हं हाती घेणार नाही. मग त्यांनी माझा उमेदवार जाहीर केला. माझी काय हरकत नाही. पण नेमकं काय घडलं? अनेकांना असं वाटलं की एक चिन्हं तरी घ्यायचं होतं, कुठलीतरी चिन्हं घ्यावच लागणार होतं. मग तुम्ही मशाल चिन्हं का घेतलं नाही? मला लोकं विचारतात म्हणून मी हा खुलासा करतोय”, असं स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिलं आहे.
” किती गोळ्या घालायच्या तेवढ्या घाला, मी मागे हटणार नाही..! ” सुजय विखेंच्या बाबत व्हायरल झालेल्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपने अहमदनगरमध्ये खळबळ
उद्धव ठाकरे यांनी सुरवातीला पाठिंब्याचा शब्द दिला होता. यावर राजू शेट्टी म्हणाले कि, “उद्धव ठाकरेंनी मला फसवलं असं मी म्हणणार नाही. पण शब्द फिरवला असं म्हणता येईल. फसवणं असं म्हणता येणार नाही कारण मी आघाडीतच नव्हतो. तर फसवण्याचा मुद्दा येत नाही. पण अनेक शिवसैनिकांची इच्छा होती की उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांनीसुद्धा सुरुवातीला सकारात्मक दृष्टीकोन ठेवला. पण नंतर मला माहिती आहे, सर्व साखर कारखाने परस्पर भेटले असतील. आम्हाला काटा काढण्याची संधी आली आहे ती द्या, असं ते म्हणाले असतील”, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.