माढा : माढा लोकसभा मतदार संघामध्ये Lok Sabha Election 2024 महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही. दरम्यान उमेदवारी नेमकी कोणाला मिळणाऱ प्रक्रियेला आता वेग आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांनी त्यांची भेट घेऊन या लोकसभेसाठी ते माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितलं.
आज दिल्लीमध्ये शरद पवार यांची प्रवीण गायकवाड यांनी भेट घेतली. प्रवीण गायकवाड हे अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांचे स्वतःचे निवासस्थान हे अकलूजमध्ये असले तरी माढा लोकसभा मतदार संघामध्ये त्यांच्या जास्त ओळखी आहेत, आणि कार्य आहे अशी माहिती त्यांनी शरद पवार यांना दिली.
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीची लोकसभेसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; या 11 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
आज या भेटीदरम्यान प्रवीण गायकवाड यांनी माहिती दिली कि, माढा लोकसभा मतदारसंघात जर मोहिते पाटील कुटुंबीय निवडणूक लढवणार नसतील तर ते या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. सुरुवातीला माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जवळपास निश्चित केलं होतं. पण ऐनवेळी राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांना परभणीतून भाजप उमेदवारी शनिवारी जाहीर केली. त्यानंतर आता माढा लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार ? अशा चर्चा सुरू झाल्या. दरम्यान आज आता सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांनी शरद पवार यांची थेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय कळवतो असं प्रवीण गायकवाड यांना सांगितलं असल्याचं समजत आहे.