मुंबई : यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये Winter Session तापलेल्या मुद्द्यांपैकी एक ठरला आहे तो म्हणजे सलीम कुत्ता या गँगस्टरचा विषय ! सलीम कुत्ता सोबत नाशिकचे उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर Sudhakar Badgujar यांचे काही पार्टीतील फोटो नितेश राणे Nitesh Rane यांनी थेट विधानसभेत दाखवले. या फोटो नंतर हिवाळी अधिवेशनामध्ये वादळ आले होते. दरम्यान हे वादळ अद्याप देखील शमले नसून आज पुन्हा एकदा नवीन विषयाला पेव फुटला आहे. ” नितेश राणे हे वेडे झाले असून, सलीम कुत्ता याचा केव्हाच मृत्यू झाला असल्याचं धक्कादायक वक्तव्य आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले आमदार कैलास गोरंट्याल ?
नाशिकचे उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्ता सोबतचे पार्टीतील फोटो आमदार नितेश राणे यांनी सादर केले आहेत या फोटोवर चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत तथापि आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी नितेश राणे यांना थेट वेडे म्हणून हल्ला बोल केला आहे यावेळी कैलास गोरंट्याल म्हणाले की, सलीम कुत्ता याची 1998 मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती, असा खळबळजनक दावा आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात केला. ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार 1998 साली 1993 बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ता याचा रुग्णालयात मर्डर झाला आहे. रोहित वर्मा भानू ढाकरे आणि संतोष शेट्टी हे छोटा राजन चे हस्तक आहेत. त्यांनी त्याला मारला आहे. आता यामध्ये नवीन सलीम कुत्ता यांनी कुठून आणला हे माहीत नाही. सलीम कुत्ता यांच्या तीन पत्नी आहेत त्यांनी कोर्टात सुद्धा सांगितले की आमचा पती वारला. त्यांनी हे सुद्धा सांगितले की आमची जी प्रॉपर्टी सील केली आहे, ती रिलीज करा. टाडा कडून त्याची प्रॉपर्टी सुद्धा रिलीज करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांना या सगळ्या बाबत माहिती असतात त्यामुळे सभागृहात त्यांनी निवेदन केलं पाहिजे, असे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.
दरम्यान या फोटो नंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर सुधाकर बडगुजर यांची नाशिक पोलीस गुन्हे शाखेकडून चौकशी देखील सुरू आहे. परंतु खरंच सलीम कुत्ता याची हत्या झाली आहे का ? फोटोतील व्यक्ती नेमकी कोण ? यावर आता वादंग सुरु आहे.