मुंबई : डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुमकीन है ! या अमिताभ बच्चनच्या डायलॉगमध्ये थेट मुख्यमंत्र्यांनी आता शब्द बदलून मोदी को हराना मुश्किल ही नही नामुमकीन है ! असं थेट आव्हानच विरोधकांना दिलय.
मुंबईमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अशा बॉलीवूड स्टाईलमध्ये विरोधकांना आव्हान देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसून आले. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घाम गाळत आहेत. शिवसेनेसह महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा, मेळावे, रॅली आणि अगदी उमेदवारी अर्ज भरताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहत आहेत.
दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ” तुम्ही मागच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचं काम केलं. त्याच्यासाठी मेहनत घेतली. खरंतर त्या उमेदवाराचं काम करायला कार्यकर्ते तयार नव्हते. त्यामुळे मीच उमेदवार असे समजून मतदान करा. असं मला सर्वांना सांगावं लागेल. मात्र या निवडणुकीत मागचे सर्व विक्रम मोडीत काढा. आपण उमेदवारी या भावनेने काम करून विरोधकांच्या चारही मुंड्या चित करा. विरोधी पक्षानं ठाण्याचं नाव घेता कामा नये असं थेट आव्हानच त्यांनी दिलं.
त्याचबरोबर घरात बसून किंवा फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही. त्यासाठी जमिनीवरून उतरून काम करावे लागते. एकीकडे देशाला वाचवण्यासाठी लोकशाहीला पुढे नेण्यासाठी तसेच विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. दुसरीकडे देश बुडवायला निघालेली इंडिया आघाडी आहे. देशभक्त त्यांना थारा देणार नाहीत. त्यामुळेच मोदी को हराना मुश्किल ही नही नामुमकीन है असं एकनाथ शिंदे म्हणाले आहे.