कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे दिग्गज नेते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अशातच काही उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी P M Narendra Modi हे देखील महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोल्हापूरमध्ये आहे.
कोल्हापूर, पुणे, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रमुख लढतींमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. याबाबत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ” भाजपने त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करणं चुकीचं आहे. छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावे ही आमची भूमिका होती. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती. तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली. भाजप, नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजां विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत. शिवाजी महाराजांच्या गादीविरोधात तुम्ही प्रचाराला आला आहात. नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजां विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्रातील जनता हे कधीच विसरणार नाही. ” असा हल्लाबोल यावेळी संजय राऊत यांनी केला.