पुणे : मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे जुने जाणते नेते वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन मोठा धक्का दिला आहे. दरम्यान आता ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी लढवणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. कारण मंगळवारी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांच्या मनातील इच्छा स्पष्ट बोलून दाखवली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील अनेक महिन्यांपासून दडवून ठेवलेल्या राजकीय इच्छा आकांक्षांना वाट मोकळी करून दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, ” मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम आहे. कुणाकडून लढवणार हे लवकर जाहीर करणार आहे. काँग्रेसकडून मला विचारणा करण्यात आली आहे. माझी आमदार मोहन जोशींचा मला फोन आला होता. तसेच उद्धव ठाकरे गटाने सुद्धा मला ऑफर दिली आहे असं स्पष्ट सांगून मला राज ठाकरेंशी बोलायचं नाहीये. अविनाश जाधव यांनी काही बोलू नये अन्यथा मलाही बोलावं लागेल आणि लवकरच त्यांच्या टीकेला देखील उत्तर देणार असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटला आहे.
वसंत मोरे यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळले गेले आहे. दरम्यान वसंत मोरे हे पक्षामध्ये नाराज असल्याचं अनेक दिवसांपासून स्पष्ट दिसून येत होते. त्यांच्या व्हाट्सअप स्टेटस वरून देखील ते आपल्या मनातील खतखद अनेक वेळा व्यक्त करत होते. तर आता ” माझा वाद राजसाहेबांसोबत नव्हता पुण्यात माझ्या विरोधात जे राजकारण झालं त्याला कंटाळून मी राजीनामा देत असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. पण आता यानंतर वसंत मोरे हे नेमके कोणत्या पक्षाच्या बाजूने लोकसभा लढवणार यावर तर कविता लढवले जात आहेत.