बीड : मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही संपलेला नाही. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. येत्या 24 मार्चला अंतरवालीसराटीमध्ये जरांगे पाटील हे बैठक घेणार असल्याची माहिती समजते आहे. या बैठकीमध्ये मराठा समाजाची राजकीय भूमिका पुढे काय असणार यावर भाष्य करणार असल्याचं म्हटले जाते.
दरम्यान मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, ” पहाटे तीन वाजता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. बीडच्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती त्यांनी दिली आहे. या फोनवरील संभाषणामध्ये फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं आश्वासन दिलं आहे असं ते म्हणाले.
यावेळी पोलिसांकडून मराठा समाजावर अन्याय होईल. दिखावा करणे सुरूच आहे. त्यामुळे एकीकडून गुन्हे दाखल करायचे आणि दुसरीकडे आश्वासन द्यायचे… जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
जरांगे पाटील लवकर 900 एकरवर भव्य सभा घेणार असल्याचे देखील म्हटलं आहे. या बैठकीमध्ये मराठा समाजाची राजकीय भूमिका काय असेल या महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली जाणार असल्याच स्पष्ट केलं आहे.