अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात राजकीय हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. तर राज्यात आगामी निवडणूकांच्या जागेसाठी सर्व पक्षांमध्ये ओढाताण सुरु आहे. या वर्षभरात शिवसेनेतून शिंदे गटानंतर आता राष्ट्रवादीतून अजित पवारांचा गट देखील वेगळा झाल्याचं राजकीय नाट्य पहायला मिळालं. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या निवडणूका होणार असल्याचे मोठे संकेत दिले आहे. या निवडणूका सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाचे परिपत्रक
सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) निवडणूक आयोगाला (election commission) पावसाळ्यानंतर निवडणूका घेण्यास सांगितले होते. त्यानंतर ५ जुलै २०२३ रोजी राज्य निवडणूक आयोगाचं परिपत्रक(circular by election commission) जाहीर करण्यात आलं होतं. या परिपत्रकात लवकरंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार (election will held soon in Maharashtra ) असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका (Local bodies election) या सप्टेंबर ते ऑक्टोबर (September to October) दरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी आवश्यक असणाऱ्या मतदार याद्या(voters lists) तयार करण्याच्या सूचना देण्यात येत असल्याचेही परिपत्रकमध्ये नोंद आहे. हे परिपत्रक सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

कोणत्या निवडणूका रखडल्या?
महाराष्ट्रातील एकूण २३ महानगरपालिकांची मुदत सपंली आहे. त्याबरोबरच राज्यातील २५ जिल्हा परिषद आणि २०७ नगरपालिकांची निवडणूक पुढे पुढेच ढकलण्यात येत आहेत. ग्रामीण भागासाठी जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणूका अत्यंत आवश्यक असतात. त्याबरोबरच ९२ नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजून हवेतच असून त्याचा निकाल अजून लागलेला नाही. मात्र यात निवडणूक आयोगाने लक्ष दिलेलं नाही आणि परिणामी त्या निवडणूका अजूनही घेण्यात आलेल्या नाहीत. या सगळ्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाला पावसाळ्यानंतर निवडणूका घ्यायला सांगितले होते. त्यानुसार आता सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान निवडणूका घेण्यात येणार आहेत. यासाठी इच्छूक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत.
आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम
मुंबई आणि पुण्यासोबत राज्यातील इतर महापालिकांच्या थांबलेल्या निवडणूका या सप्टेंबरमध्ये तर राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूका या ऑक्टोबर महिन्यात होण्याची दाट शक्यता निवडणूक आयोगाकडून वर्तविली जात आहे. राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणूका या येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम असणार आहे.
निवडणूक का लांबल्या?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “आम्ही निवडणूका लांबवल्या नाहीत. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्यामुळे निवडणूका लांबल्या आहेत.” त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणूका होतील, असा अंदाज देखील त्यांनी ५ जुलैला वर्तवला होता.