शिरूर : शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिरूर तालुक्यातील आंबळे गावामध्ये गरोदर माता आणि बाळांना दिलेल्या पोषण आहारात चक्क अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अमोल कोल्हे Amol Kolhe यांनी संताप व्यक्त केला.
Lok Sabha Elections 2024 : भेटीगाठी, बैठका, पाठिंबा, आता उद्या पुन्हा शिवतीर्थवर महत्त्वाची बैठक.. ! महायुतीला चौथे ‘इंजिन’ लागणार का ?
अमोल कोल्हे म्हणाले की, ” नेमकं पोषण कोणाचं केलं जातंय ? कंत्राटदाराच कि गरोदर माता आणि पोटातल्या बाळाचं ? बाजारातून एक्सपायरी डेट जवळ आलेला खराब होऊ शकणारा जुना माल खरेदी करायचा आणि तो चढ्या दराने कंत्राटातून विक्री करायचा. अशी साखळी समोर येते. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी. ” अशी मागणी यावेळी अमोल कोल्हे यांनी केली आहे.