राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना हे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येणार आहेत. मात्र, अजित पवारांच्या या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलाय. अजित पवारांना बोलावू नका, त्यांनी येऊ नये आशा आशयाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि कारखान्याला दिले आहे. जर अजित पवार कार्यक्रमस्थळी आले तर अजित पवारांना कारखान्यात जावू दिले जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. बारामती तालुक्यात कोणत्याच राजकीय पक्षाच्या लोकांना बारामती फिरु देणार नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे.
हे तुम्ही वाचले का ? पुन्हा आमरण उपोषण सुरु !” सरकारला दिलेली वेळ संपली; मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण अडवतंय? जरांगे पाटील यांचा सवाल
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन दिवसेंदिवस राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. अनेक गावांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. आरक्षण दिल्याशिवाय गावात पाऊल ठेऊ नका असा इशारा आंदोलकांनी दिलाय. अन्न-पाणी घेणार नाही, औषधं घेणार नाही. गावात कुणी आलं तर त्यांना शांततेत माघारी पाठवा, असं आवाहन जरांगे यांनी गावकऱ्यांना केलं आहे.
हे तुम्ही वाचले का ? आमदार रोहित पवार यांचा तरुणांसाठी संघर्ष सुरु; बेरोजगारी, रखडलेली नोकर भरती यांसारख्या प्रमुख मागण्यासाठी युवा संघर्ष मोर्चाला प्रारंभ
उग्र आंदोलन करू नका, आंदोलन शांततेनं करा, आत्महत्या करू नका, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करतंय. सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेटम संपला, 41 दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.