तामिळनाडू : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी Disproportionate Assets Case तामिळनाडूचे Tamilnadu उच्च शिक्षणमंत्री के. पोनमुडी Higher Education Minister Ponmudi यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही शिक्षा सुनावली. आता पोनमुडी यांना मंत्र्यांसह आमदार पदावर राहता येणार नाही.
के. पोनमुडी यांच्या पत्नीला 50 लाखांचा दंड
न्यायमूर्ती जी. जयचंद्रन यांनी पोनमुडी यांची पत्नी पी. विशालाक्षी यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी पोनमुडी आणि त्याच्या पत्नीला प्रत्येकी ५० लाख रुपयांचा दंडही ठोठावला. या प्रकरणी उच्च न्यायालयाने यापूर्वीच मंत्री आणि त्यांच्या पत्नीला दोषी ठरवत आज शिक्षा सुनावली होती.
30 दिवसांच्या शिक्षेतून दिलासा
आरोपींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील एन. आर. एलांगो यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यासाठी आणि शिक्षा स्थगित करण्यासाठी त्यांना रजा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. दरम्यान न्यायाधीशांनी ३० दिवसांची रजा मंजूर करून ३० दिवसांची शिक्षा स्थगित केली.
निलंबनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पोनमुडीला विल्लुपुरम येथील कनिष्ठ न्यायालयात शरण यावे लागेल, असेही न्यायाधीशांनी सांगितले. दोष सिद्ध झाल्या नंतर पोनमुडी आमदार म्हणून अपात्र ठरले असून त्यांना मंत्रीपदही गमवावे लागले आहे.