धाराशिव : सध्या Dharashiv लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे राजकीय प्रमुख नेते, उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं शक्ती प्रदर्शन आणि प्रचार करत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रचार करत असताना प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांना देखील उष्माघाताचा त्रास झाला. तर आज ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेदरम्यान आमदार कैलास पाटील MLA Kailash Patil यांना देखील उष्माघाताचा त्रास झाला आहे.
आज महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी धाराशिव शहरातून शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये पक्षाचे अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते. यात धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे देखील उत्साहाने सहभागी झाले. परंतु काही वेळानं त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली पडले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सध्या आमदार कैलास पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. योग्य वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
Baramati Lok Sabha Election 2024 : नणंद-भावजय एकाच दिवशी भरणार उमेदवारी अर्ज; उपमुख्यमंत्री अजित पवार देखील भरणार डमी उमेदवारी अर्ज ? लढाई आता प्रतिष्ठेची
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी आणि उमेदवार जोमानं प्रचार करत आहेत. पण या निवडणुकीमध्ये केवळ मतदाताच नाही तर निसर्ग देखील कठोर परीक्षा घेताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये उष्णतेची प्रचंड लाट आहे. आजचे तापमान 37 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आल आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचाव होण्यासाठी खबरदारीचे उपाय करणे देखील महत्त्वाचे आहे.