मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून एसटीचे आरक्षण Dhangar Reservation देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाला राज्यभरात आंदोलने केली आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे. या मागणीसाठी हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज पासून सुनावणीला सुरुवात होते आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
शासकीय दस्त नुसार ‘धनगड’ अशी नोंद आहे. परंतु राज्यातील धनगर हे धनगड नसून धनगर आहेत. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
धनगर समाजाला OBC चे राजकीय आरक्षण
सध्या महाराष्ट्रातील धनगर समाजाला ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळते आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आहे. शासन दरबारी असलेला धनगड शब्द यामुळे आरक्षण अद्याप देखील खोळंबले होते. यावरच आता आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणीला प्रारंभ होतो आहे.
काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर
धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील समाजासोबत उभे राहून प्रयत्न केले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना निकाल आमच्याच बाजूने लागेल आणि धनगर समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास पडळकर यांनी बोलताना व्यक्त केला आहे.