नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वच नेत्यांचे प्रचार आणि दौरे सुरू आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांची महिला खासदाराबाबत बोलताना जीभ घसरली आहे. सुरजेवाला यांनी मथुरेच्या खासदार हेमामालिनी यांच्याबाबत अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली आहे.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी मथुरेच्या खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या हेमामालिनी यांच्याबाबत टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे नेत्यासह अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील थेट शब्दात टीका केली आहे.
अभिनेत्री कंगना राणावत हिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून म्हटले आहे की, ” तुमचे नेते तर मोहब्बत की दुकान उघडणार म्हणत होते. आता तुम्ही द्वेष आणि तिरस्काराचे दुकान उघडलं आहे. महिलांबद्दल निकृष्ट दृष्टिकोन असलेले काँग्रेस नेते अपरिहार्य पराभवाच्या निराशेने दिवसेंदिवस चारित्र्य बिघडवत आहेत असे कंगनाने म्हटले आहे.
भाजपच्या आयटी विभाग प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्या त्यांनी लिहिले आहे की, ” त्यांची ही टिप्पणी केवळ हेमा मालिनी यांच्यासाठीच नाही तर सर्वसामान्य महिलांसाठी ही अपमानास्पद आहे. यावरून प्रमुख विरोधी पक्ष महिलांचा द्वेष करत असल्याचं दिसून येत आहे. ” असा आरोप भाजपने केला आहे.
यावर स्वतः खासदार हेमामालिनी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, ” मला काही फरक पडत नाही. विरोधकांचे काम आरोप करणं आहे. ते मला चांगल्या गोष्टी सांगणार नाहीत. तसेच ते जे काही बोलत आहेत त्यामुळे मला काही फरक पडत नाही. मी माझे काम केले आहे. ” असं हेमा मालिनी म्हंटल्या आहेत.