धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून आहेत. कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, धाराशिव Dharashiv या जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लढती झाले आहेत. आज धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभेसाठी उपस्थित त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करून देण्याचे आवाहन केलं आहे.

आजच्या धाराशिव मधील सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे ते म्हणाले की, ” काँग्रेसची नजर आता तुमच्या पैशावर पडली आहे. गरिबांची एकच इच्छा असते की त्यांनी कमावलेली संपत्ती आपल्या मुलांकडे जावि पण आता काँग्रेस तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहे. काँग्रेसच्या एका फिलॉस ऑफरने एक घोषणा देखील करून टाकली आहे जे स्त्रीधन आहे मंगळसूत्र आहे ते आता तुमचे राहणार नाही ते एक्स-रे करण्याची भाषा करत आहेत अशी जोरदार टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.
तसेच ते म्हणाले कि , काँग्रेसचा तुमच्या घरावर छापा टाकून अर्धी संपत्ती लुटण्याचा त्यांचा इरादा आहे. काँग्रेस महिलेचे मंगळसूत्र दागिने हिसकावण्याची तयारी करत आहेत. भारताच्या वारशाचा देखील काँग्रेसला तीटकारा आहे. देशभरातील भक्त प्रभू रामचंद्र यांच्या दर्शनासाठी जात आहेत. पण काँग्रेस खोटी शिवसेना आणि खोटी राष्ट्रवादी निमंत्रण असून दर्शनाला गेली नाही. अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का ? अस यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना केला आहे.