मुंबई : मनुस्मृतीतील श्लोक शालेय अभ्यासक्रमात घेण्यावरून महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड तापलेल आहे. दरम्यान सध्या महायुतीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal हे सातत्याने महायुतीलाच Mahayuti घरचा आहेर देत आहेत. म्हणून मनुस्मृतीचा manusmruti चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये अशी रोखठोक भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ
मनुस्मृतीतील श्लोक शालेय अभ्यासक्रमात घेण्यावरून विरोध दर्शवताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, ” मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये. जितेंद्र आव्हाड विरोधक, त्यांचा विरोध निश्चित करा. आमचं काही म्हणणं नाही . मनुस्मृती जाळा जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती. आमची भूमिका फुले, शाहू, आंबेडकरांची आहे. जितेंद्र आव्हाड मुंबईवरून महाडला गेले. मात्र त्यांची भूमिका तिथे जाऊन मनुस्मृती जाळणे होती. त्यांचं चुकलं त्यांना काही शिक्षा करायची ते करा. माझे काहीही म्हणणे नाही. तुम्हाला अधिकार केव्हा येईल, जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल तेव्हा ! ” अशी रोखठोक भूमिका यावेळी छगन भुजबळ यांनी मांडली आहे.
मनुस्मृतीतील श्लोक शालेय अभ्यासक्रमात घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये जाऊन चवदार तळ्यावर आक्रमक असं आंदोलन केलं. यावेळी त्यांनी मनुस्मृती देखील अग्नीच्या हवाली केली. पण अनावधानाने त्यांच्याकडून मनुस्मृति सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील फाडला गेला. याबाबत आव्हाड यांनी माफी देखील मागितली. परंतु याबाबत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे.
दरम्यान मनुस्मृतीतील श्लोक शालेय अभ्यासक्रमात घेण्याचा कोणताही इरादा नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
भयानक वास्तव! नद्यांसोबत आता विहिरींचा देखील श्वास कोंडला; पैठणच्या MIDC तून कंपनीतील केमिकल युक्त पाणी थेट शेतकऱ्यांच्या विहिरीत