सांगली : सांगलीतील Sangali वातावरण अजून देखील धगधगतच आहे. महाविकास आघाडीतून अद्याप देखील काही जागांचा तिढा हा किचकटच आहे. दरम्यान सांगलीची जागा ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गेल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं.
विशेष म्हणजे आज आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या इमारतीवरून काँग्रेसचे नावच मिटवल आहे.
नेमकं काय घडलं ?
कोल्हापूर लोकसभा मतदार संघाच्या जागेवर ही शाहू छत्रपती यांना काँग्रेसच्या वतीने उमेदवारी जाहीर करता आली. त्या बदल्यात सांगलीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जागा देण्यात आली आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. दरम्यान सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे पहिल्यापासून आग्रही होते. त्यासाठी ते दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे जाऊन देखील चर्चा करून आले होते. परंतु महाविकास आघाडीच्या वतीने ही जागा शिवसेनेला देण्यात आली आणि याच कारणामुळे सांगलीमध्ये वाद निर्माण झाला आहे.
PM Narendra Modi : ” खुद्द बाबासाहेब आले तरी संविधान संपवू शकत नाही..! ” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
महाविकास आघाडीने घेतलेल्या या निर्णयाने सांगलीतील काँग्रेस नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. तर काँग्रेसने काही दिवसांपूर्वी विश्वजीत कदम यांना देखील डावलून काँग्रेसच्याच विशाल पाटील यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या असल्याच समजते. परंतु आता ही जागा शिवसेनेला गेल्यामुळे विशाल पाटील देखील अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे.