नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये Lok Sabha Election 2024 भाजपला BJP देशभरात चांगलाच फटका सहन करावा लागला. 2014 आणि 2019 मध्ये मोदी लाटेने मोठा विजय प्राप्त केला होता. पण 2024 च्या निवडणुकांमध्ये देशांमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सर्वात जास्त मोठा फटका सहन करावा लागला आहे. दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले डावे आणि उजवे हात असलेले खास मंत्री आणि पदाधिकारी महाराष्ट्रावर वॉच ठेवण्यासाठी पाठवले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काही संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला. असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळते आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या आदेशान्वये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहभागी म्हणून अश्विन वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे निकटवर्तीय मानले जातात.
कोण आहेत भूपेंद्र यादव
भूपेंद्र यादव हे विद्यमान केंद्रीय मंत्री आहेत. अमित शहा यांचे ते निकटवर्तीय असून गुजरात आणि बिहारच्या प्रभारी म्हणून त्यांनी याआधी काम पाहिलेला आहे.
कोण आहेत अश्विन वैष्णव
अश्विन वैष्णव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मानले जातात.
त्यामुळे भाजपची महाराष्ट्रात झालेली पडझड पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास नेत्यांना महाराष्ट्रावर वॉच ठेवण्यासाठी पाठवला आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असून भाजपने यावेळी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.