सोलापूर : काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे Former Chief Minister Sushil Kumar Shinde यांनी भाजपकडून BJP त्यांना स्वतःला आणि प्रणिती शिंदे Praniti Shinde यांना देखील पक्षात येण्याची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यात आता आज संध्याकाळी पाच वाजता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे सुशील कुमार शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे पाटील आणि शिंदे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
काय म्हणाले माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ?
काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते की, ” प्रणिती शिंदे आणि मला भाजपकडून आमच्या पक्षात या असं सांगितलं जातं आहे. माझा दोन वेळा पराभव झाला असला तरीही काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही. आता मी 83 वर्षाचा आहे. त्यामुळे मी दुसऱ्याच बरोबर आहे ! असं म्हणणार नाही. तर प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. असे देखील त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे.
कार्यकर्त्यांना दिला अनुभवी सल्ला
आपल्याला भाजपची ऑफर असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना देखील आपला सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, ” राजकारणामध्ये पराभव होत राहतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत असं झालं. मात्र पराभवाबाबतित पंडित नेहरू म्हणाले होते की, लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावं लागतं. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो, पुन्हा उठतो…, पुन्हा पडतो.., पुन्हा उठतो…! मग तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधीही पडत नाही. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका. आज वाईट दिवस आहेत. मात्र ते दिवस निघून जातील असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.
एकीकडे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशील कुमार शिंदे यांनी भाजपच्या ऑफर विषयी दिलेली माहिती आणि आज सायंकाळी भाजपचे जुने जाणते नेते चंद्रकांत पाटील यांची भेट यामुळे मात्र राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू आहे.