मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी महाविकास आघाडी सोबत न जाण्याचा निर्णय घेऊन स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार आता त्यांनी आपल्या लोकसभेसाठीच्या उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 11 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
दुसऱ्या यादीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मराठवाडा मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये,
- हिंगोली – डॉ. बी डी चव्हाण
- लातूर – नरसिंहराव उदगीरकर
- सोलापूर – काशिनाथ गायकवाड
- माढा – रमेश बारस्कर
- सातारा – मारुती जानकर
- धुळे – अब्दुल रहमान
- हातकणंगले – दादासाहेब गोंडा पाटील
- रावेर – संजय पंडित ब्राह्मणेजालना – प्रभाकर बकले
- मुंबई उत्तर मध्य – अब्दुल हसन खान
- रत्नागिरी सिंधुदुर्ग – काका जोशी
या 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी विचारपूर्वक निर्णय घेतले आहेत. नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेताना ते म्हणाले की, मागील निवडणुकीमध्ये 8 जागा या काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच पडल्या होत्या. हिंदू मतं मिळाली, पण मुस्लिम मत काँग्रेस राष्ट्रवादीमुळे विभागली गेली. आणि त्यामुळेच आमचा पराभव झाला. एकंदरीतच प्रकाश आंबेडकर यांच्या या उमेदवारांच्या नावांची यादी पाहता विविध जाती आणि धर्मातील उमेदवारांना यावेळी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडी आणि महायुती समोर असणार आहे.