मुंबई : काल राजकीय वर्तुळात आणखीन एक नवीन गदारोळ झाला तो राष्ट्रवादीच्या नाव आणि पक्ष चिन्हावरून…, निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल केलं. त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह काय असणार याबाबत उत्सुकता असतानाच महत्त्वाची बातमी समोर येते आहे. शरद पवार यांनी ‘ राष्ट्रवादी शरद पवार’, ‘ मी राष्ट्रवादी’, आणि ‘शरद पवार स्वाभिमानी पक्ष’ असे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे सोपवणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं गेल्यानंतर शरद पवार यांना आज दुपारी चार वाजेपर्यंत पक्षाचे नाव आणि चिन्ह संदर्भात अर्ज करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यानुसार शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी शरद पवार , मी राष्ट्रवादी आणि शरद पवार स्वाभिमानी पक्ष हे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे सोपवले जाणार असल्याचं समजत आहे. त्यानंतर निवडणूक अयोग्य कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करते काही वेळातच समजून शकेल.