बीड : पंकजा मुंडे यांची गाडी बीडमध्ये अडवण्यात आली आहे. या जमावानं पंकजा मुंडे यांची गाडी आल्यानंतर काळे झेंडे दाखवले आणि गाडी अडवली. हा जमा अत्यंत आक्रमक झाला होता. पोलिसांनी सुरुवातीला सर्वांना विनंती केली पण परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला आहे.
पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यानंतर हा जमाव पांगला आहे. वातावरण आता नियंत्रणात असलं तरी अद्याप देखील तापलेलेच आहे. दरम्यान हे जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलक होते. यावेळी या आंदोलनकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील दिल्या. त्यामुळे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे होते असे म्हटले जात आहे.
ज्या जमावानं पंकजा मुंडे यांची गाडी अडवली ते आंदोलक जरांगे पाटील यांचे नव्हते. ते नेमके कुणाचे आंदोलक होते याबाबत पोलिसांकडून माहिती घेईल अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, ” मी दरवर्षीच तुकाराम बीजच्या कार्यक्रमाला जात असते. आज देखील त्या या कार्यक्रमासाठी जात होत्या. परंतु या आंदोलनामुळे त्यांना आज कार्यक्रमास जाता आले नाही.