पुणे : मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली असून हात देखील फ्रॅक्चर झाला आहे. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप वळसे पाटील यांचा काल रात्री घरातच अपघात झाला. रात्री लाईट लावण्यासाठी ते उठले असता पाय घसरून पडले या अपघातात त्यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर हात फ्रॅक्चर झाला आहे. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याविषयी त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर अकाउंट वरून माहिती दिली आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल असं त्यांनी लिहिल आहे.